दोन व्यक्ती देवासमोर येतात
उद्देश | आपण प्रार्थनेत देवाकडे कसे यावे अशी देवाची इच्छा आहे ते मुलांना दाखवणे. |
शास्त्रवाचन | लूक 18:9-14 |
पाठांतर वचन | नवीन पाठ करायचे वचन नाही आतापर्यंत शिकलेल्या उताऱ्याची उजळणी करा. |
पाठाचे सादरीकरण
सुरुवात
वर्गातील तीन मुलांना निवडा आणि धड्याची सुरुवात करण्यासाठी एक छोटे नाटक तयार करा. एक मूल दुकानदार आणि इतर दोन ग्राहक असावेत. ग्राहकांनी आळीपाळीने दुकानात येऊन काहीतरी विकत घ्यावे. पहिला ग्राहक गर्विष्ठ आणि उद्धट वृत्तीचा असावा, तर दुसरा सभ्य असावा. दुकानदाराकडून कोणाला चांगली सेवा मिळते ते वर्गाला स्पष्टपणे पाहू द्या.
पाठातील मुख्य मुद्दे
1. येशूने दोन व्यक्तींची गोष्ट सांगितली, ज्या एकमेकांपेक्षा अगदी वेगळ्या वागल्या. दोघे प्रार्थना करायला मंदिरात गेले. एक परूशी होता, म्हणजे तो धार्मिक पुढारी होता आणि लोक त्याचा आदर करत. दुसरा जकातदार होता. येशूच्या काळात ते काम अनेकदा माणसाला वाळीत टाकले जाण्यास कारणीभूत ठरत असे. जकातदार द्वेषाने पाहिल्या जाणाऱ्या रोमन सरकारसाठी काम करत ही गोष्ट वाईट होतीच, पण ते अनेकदा अप्रामाणिकही असत आणि लोकांकडून आवश्यकतेपेक्षा जास्त पैसे घेत (लूक 18:10).
2. परूशी सर्वांना दिसेल अशा ठिकाणी उभा राहिला. त्याची प्रार्थना पूर्णपणे तो किती चांगला आहे आणि लोभी, अप्रामाणिक किंवा अनैतिक असलेल्या इतरांपेक्षा तो चांगला आहे याचा त्याला किती आनंद आहे याविषयी होती. तो तिकडे उभ्या असलेल्या त्या दुष्ट जकातदारासारखा नक्कीच नव्हता. त्याने देवासाठी केलेल्या सर्व चांगल्या गोष्टींविषयी बढाई मारली. देवाच्या नियमशास्त्राने माणसाला वर्षातून फक्त एकदाच उपास करायला (अन्नाशिवाय राहायला) सांगितले असले तरी तो आठवड्यातून दोनदा उपास करी (18:11-12). परूशाला देवाची मुळीच गरज नसल्यासारखे वाटत होते, जणू तो इतका अद्भुत असल्याबद्दल देवानेच त्याचे आभार मानायला हवेत, उलट नाही!
3. जकातदाराची प्रार्थना आणि वृत्ती खूप वेगळी होती. तो पवित्र देवासमोर येणारा पापी आहे हे त्याला माहीत होते. त्याने देवाला नम्रपणे आपल्याला मदत करायला आणि वाचवायला सांगितले (18:13). चित्र 19 दाखवा. दोन माणसांतील फरक पुन्हा एकदा दाखवून द्या.
4. येशूने आपल्या श्रोत्यांना सांगितले की देवाने जकातदाराची प्रार्थना ऐकली आणि तिला उत्तर दिले. तो आपल्या पापांची क्षमा होऊन आणि देवाशी नाते पुन्हा जुळून घरी गेला. परूशी फक्त आपल्या गर्वासह घरी गेला (18:14).
कथेला आपला प्रतिसाद
शाळेत मुख्याध्यापक तुमच्या वर्गात येतात तेव्हा तुम्ही कसे वागता? मुलांना उत्तर देण्यासाठी वेळ द्या. आपण त्यांच्यासमोर गर्विष्ठ आणि बढाईखोर नसतो. आपण तसे वागलो तर त्यांना वाटेल की आपल्याला त्यांची मदत किंवा नेतृत्वाची कधीच गरज नव्हती.
आपण म्हणू शकतो की देव आपल्या प्रमुखासारखा आहे, जरी तो प्रत्यक्षात त्याहून कितीतरी अधिक आहे. तो आपला निर्माता आणि प्रेमळ पिताही आहे. पण आपण त्याची अवज्ञा करणारे पापी आहोत, म्हणून आपण त्याच्याशी बोलतो तेव्हा सर्वप्रथम देवाकडे क्षमा मागण्याची गरज आहे. आपल्यातील सर्व काही सुरळीत झाल्यावरच देव आपण सांगायच्या इतर गोष्टी ऐकेल.
गर्विष्ठ लोक देवावर भरवसा ठेवण्याऐवजी स्वतःवर आणि आपल्या क्षमतेवर भरवसा ठेवतात, जसे नामानाने बरे होण्यापूर्वी केले. गरज असल्यास मुलांना नामानाच्या गोष्टीची आठवण करून द्या. ज्यांना वाटते की आपल्याला मदतीची गरज नाही त्यांना देव मदत करणार नाही (18:9, 14).
पाठांतर वचन पक्के करा
Copyright © Global Recordings Network. Used by permission.
पाठ - 19: दोन व्यक्ती देवासमोर येतात
शास्त्रवाचन: लूक 18:9-14
1. मी कोण आहे?
यांतून निवडा: परूशी, जकातदार, देव
- मी माझ्या चांगुलपणाविषयी बढाई मारली. मी कोण? __________ 👉 परूशी
- मी म्हणालो, “हे देवा, मज पाप्यावर दया कर.” मी कोण? __________ 👉 जकातदार
- मी नम्र लोकांची प्रार्थना ऐकतो. मी कोण? __________ 👉 देव
2. गर्विष्ठ की नम्र? ग/न
गर्विष्ठ असेल तर ग किंवा नम्र असेल तर न लिहा:
- मी देवाची माफी मागतो. ( ___ ) 👉 न
- मला वाटते की मी इतरांपेक्षा चांगला आहे. ( ___ ) 👉 ग
- मी देवाला मला मदत करायला सांगतो. ( ___ ) 👉 न
3. योग्य शब्दांभोवती गोल करा
योग्य शब्दाला गोल करा:
- परूशी (गर्वाने / शांतपणे) उभा राहिला. 👉 गर्वाने
- जकातदाराने (खाली / वर) पाहिले आणि त्याला खेद वाटला. 👉 खाली
- तो (क्षमा मिळून / रागावून) घरी गेला. 👉 क्षमा मिळून
4. चर्चेचे प्रश्न
- परूशाच्या प्रार्थनेत काय चुकले होते?
नमुना उत्तर: त्याने बढाई मारली आणि मदत मागितली नाही.
- देवाने जकातदाराचे का ऐकले?
नमुना उत्तर: तो नम्र आणि प्रामाणिक होता.
- आपण प्रार्थनेत देवाकडे कसे आले पाहिजे?
नमुना उत्तर: नम्रपणे, माफी मागून आणि त्याच्यावर भरवसा ठेवून.
5. पाठांतर वचन:
योहान 1:5 — “प्रकाश अंधारात उजळतो, पण अंधाराने तो समजून घेतला नाही.”
याकोब 4:6 — “देव गर्विष्ठांना विरोध करतो पण नम्रांना कृपा देतो.”
6. चित्रात रंग भरा:
If the workbook does not display on your device, use the Download PDF button above.
हस्तकला 1: नम्र प्रार्थनेचे हात
साहित्य: कागद, रंगीत पेन्सिली
सूचना:
- प्रार्थना करणाऱ्या हातांची बाह्यरेषा काढा आणि कापा.
- लिहा: “हे देवा, मला मदत कर.”
- हात रंगवा.
पाठाचा मुद्दा: देव नम्र प्रार्थना ऐकतो.
हस्तकला 2: दोन माणसांचे चित्र
साहित्य: कागद, रंगीत पेन्सिली
सूचना:
- प्रार्थना करणारी दोन माणसे काढा.
- एकाला ताठ उभे करा आणि एकाला खाली वाकवा.
- लिहा: “देव नम्रांचे ऐकतो.”
पाठाचा मुद्दा: देव नम्रांवर प्रेम करतो.
खेळ 1: गर्विष्ठ आणि सभ्य
खेळण्याची पद्धत:
- दोन मुले काल्पनिक दुकानात गर्विष्ठ आणि सभ्य असल्याचा अभिनय करतात.
- कोणाला चांगली वागणूक मिळते ते वर्ग ठरवतो.
- नम्रतेविषयी बोला.
पाठाचा मुद्दा: नम्रतेने देवाला आनंद होतो.
खेळ 2: आधी माफी मागा
खेळण्याची पद्धत:
- शिक्षक चुकीच्या कृत्यांच्या छोट्या गोष्टी वाचतात.
- मुले म्हणतात, “हे देवा, मला क्षमा कर.”
- शांत प्रार्थनेने शेवट करा.
पाठाचा मुद्दा: आपण आधी क्षमा मागितली पाहिजे.
